Mahaelection

अजित पवार : राज्यात महायुतीचे सरकार येणार. 

बारामती : मागं जे झाल ते गंगेला मिळालं बारामती तालुक्यामध्ये योग्य फायदा होण्यासाठी उद्या काही झालं तरी महायुतीचं सरकार येणार आणि आपल्याला चांगले व योग्य पद मिळणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री आजित पवार  यांनी व्यक्त केला.
       उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारपासून बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर गेले असून, ५९ गावांमध्ये ते संवाद भेट दौरा करत होते त्यादरम्यान पवार यांनी स्थानिक लोकांसोबत संवाद साधला . तालुक्यातील झारगडवाडी येथे अजित पवार यांनी राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे .आपल्याला चांगले व योग्य  पद मिळणार, असा आत्मविश्वास व्यक्त केला.
लोकसभे मधी जे झालं ते झालं, तो तुमचा अधिकार होता, त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही मात्र विधानसभेला सर्वनी एकत्र येऊन मला निवडून द्या.
तुम्हाला प्रत्येकाला कोणीही प्रचाराच्या निमित्ताने येऊन भावनिक करेल, त्याला बळी  न पडता मला साथ द्या, असे पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *