विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ मध्ये छाननीनंतर २८८ मतदारसंघात ७०७३ उमेदवारांचे अर्ज वैध : मुख्य निवडणूक अधिकारी
१५ व्या महाराष्ट्र विधानसभेसाठी यंदा निवडणुका होत आहेत. महाराष्ट्रातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीकडे , राज्यातीलच नव्हे तर, देशभरातील राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागलेलं आहेत.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. २९ ऑक्टोबर २०२४ रोजीपर्यंत राज्यातील २८८ मतदारसंघांसाठी ७,९९४ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. या नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली असून २८८ मतदारसंघातील एकूण ७०७३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. आणि त्याचप्रमाणे ९२१ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.