Mahaelection

मतदान कार्ड नाही ? तरीही मतदान करता येणार!

मतदान कार्ड नाही ? तरीही मतदान करता येणार! विधानसभा निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे, अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्र नसल्यास पुढीलपैकी कोणताही एक पुरावा आवश्यक आहे.

1. आधार कार्ड

2. मनरेगा (रोजगार ओळखपत्र)

3. बँक किंवा टपाल विभागाचे पासबुक

4. कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

5. वाहनचालक परवाना

6. पॅन कार्ड

7. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड

8. पासपोर्ट

9. निवृत्तीवेतन दस्तावेज

10. केंद्र अथवा राज्य सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्रांसह ओळखपत्र

11. संसद, विधानसभा, विधान परिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र

12. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र

वरील १२ पुराव्यांपैकी मतदानासाठी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरले जाणार आहेत. सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान दिनांकाच्या किमान पाच दिवस आधी मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ इत्यादी माहिती चिठ्ठ्यांद्वारे निवडणूक कार्यालयाकडून वितरण केले जाईल. मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती – चिठ्ठी आणि छायाचित्र ओळखपत्रासोबत घेऊन यावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *