Mahaelection

राजकारणातील ईर्षा ठरतेय घोलप कुटुंबाची समस्या!

माजी मंत्री बबनराव घोलप यांनी त्यांच्या लहान कन्येला पाठविली नाव न वापरण्याची नोटीस.

नाशिकरोड: देवळाली मतदारसंघात माजी मंत्री बबनराव घोलप यांनी त्यांच्या ज्येष्ठ कन्येला महापौरपद व मुलाला आमदारकी मिळवून दिले. परंतु त्यांच्या लहान मुलीच्या नशिबात दोन्ही निवडणुकीत अपयश आले. मात्र राजकारणातील ईर्षेमुळे लहान मुलीला भावाच्या विरोधातच आमदारकीला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अखेर वडील घोलप यांना लहान मुलीला नोटीस पाठवावी लागली आहे. लग्न झालेले असल्याने सासरकडील नाव वापरावे. माहेरचे नाव नको वापरू, अशी जाहीर नोटीस देण्याची घोलप यांच्यावर वेळ आली आहे.
            राजकारणातील ईर्षेमुळे रक्ताच्या नात्यातील कशी टोकाची परिस्थिती निर्माण होते, त्याची नोटीस हे ठळक उदाहरण ठरली आहे. देवळाली मतदारसंघात व शिवसेनेतदेखील माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या नावाचा दबदबा आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आरोपांमुळे घोलपांना १९९९ मध्ये राजकीय ग्रहण लागले, असताना देखील त्यांनी डावपेच खेळत अपक्ष-पुरस्कृत उमेदवारी करत यश साध्य केले.
       त्यानंतर पुन्हा घोलप यांनी दोन पंचवार्षिक निवडणुकीमध्ये यश मिळवले. तब्बल २५ वर्ष आमदारकी भूषविली. दरम्यान २००७ मध्ये घोलप यांनी जेष्ठ कन्या नयना वालझाडे-घोलप हिला नगरसेवक म्हणून निवडून आणत महापौर पदावरदेखील बसवले. त्यानंतर जिल्हा परिषदेत पळसे गटामध्ये घोलप यांनी लहान मुलगी तनुजा हिला उमेदवारी मिळवून दिली.
      मात्र निवडणुकीमध्ये तनुजाचा पराभव होऊन घोलप यांना पहिला धक्का बसला. यादरम्यान, न्यायालयाने बबनराव घोलप यांना ६ वर्ष निवडणूक लढविण्यास बंदी घातल्याने, त्यांचे पुत्र योगेश याला निवडणुकीत उभे करून निवडूनदेखील आणले.
      लहान मुलगी तनुजा हिचा पराभवाचा झटका योगेशच्या यशामुळे पुसला गेला. मात्र 2017 च्या मनपा निवडणुकीमध्ये घोलप यांची जेष्ठ कन्या नयना व लहान कन्या तनुजा या दोघींना उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यावेळी दोन्हीही मुलींना पराभवाचा फटका बसला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *