Mahaelection

नांदगावमध्ये नेत्यांची रणनीती आणि जनतेचे मन•••

नांदगाव : नांदगाव विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नांदगाव मतदारसंघातली निवडणुक चुरशीची ठरली होती.
    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये नांदगाव विधानसभा मतदारसंघातून सुहास द्वारकानाथ कांदे यांचा विजय झाला होता. सध्या नांदगाव मधुन अनेक बंडखोरांनी माघारी घेतलेली असुन सुहास कांदे शिवसेना (शिंदे गट), गणेश धात्रक (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) व समीर भुजबळ (अपक्ष) यांच्यामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
   एकूण ३२ उमेदवारांनी अर्ज भरले होते .त्यातील, माघार घेतलेल्या उमेदवारांची संख्या १८ आहेत. आणि सध्या निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या १४ आहेत. त्यांची नावे व पक्ष पुढीलप्रमाणे आहेत : 

उमेदवारांचे नावपक्षाचे नावनिवडणूक चिन्ह
अकबर शमीम सोनवालामहाराष्ट्र नवनिर्माण सेनारेल्वे इंजिन
गणेश जगन्नाथ धात्रकशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)मशाल
गौतम नानाजी गायकवाडबहुजन समाज पक्षहत्ती
सुहास (आना) द्वारकानाथ कांदेशिवसेनाधनुष्यबाण
आनंद सुरेश शिंगारेवंचित बहुजन आघाडीगॅस सिलेंडर
कांदे सुहास (अण्णा)अपक्षकारंजा
गणेश काशिनाथ धात्रकअपक्षचिमणी
फिरोज शेख करीमअपक्षबेबी वॉकर
भुजबळ समीरअपक्षशिट्टी
डॉ. रोहन निंबाजी बोरसे अपक्षऑटो रिक्शा
वाल्मिक संजय निकमअपक्षगॅस शेगडी
वैशाली बिरुदेव व्हडगरअपक्षट्रम्पेट
सुनील तुकाराम सोनवणेअपक्षग्रामोफोन
हारुण अरब पठाणअपक्षकरनी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *