महायुतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरातून…
पहिली सभा मंगळवारी ‘तपोवनवर’
कोल्हापुर: महायुतीच्या प्रचाराचे नारळ मंगळवारी कोल्हापुरात फुटणार आहे. यापूर्वी 2014 साली महायुतीच्या विधानसभेच्या प्रचाराचा प्रारंभ इचलकरंजीतून करण्यात आला होता.आणि त्याच पद्धतीने आता कोल्हापुरातून प्रचाराचा प्रारंभ करण्याचा निर्णय महायुतीच्या दोन दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत घेतला आहे.मंगळवारी दुपारी ४ वाजता तपोवन मैदानावर महायुतीची पहिली जाहीर सभा होणारा असून या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
कोल्हापुरातील महायुतीतील मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जनसुराज्यचे संस्थापक आमदार विनय कोरे, खासदार धैर्यशील माने, भाजपचे खासदार धनंजय महाडिक तसेच नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह आमदार प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, राजेंद्र पाटील यड्रावरकर अशी सगळी मंडळी आहेत.यांच्यासह अन्य उमेदवारांवर ही पहिली प्रचार सभा यशस्वी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर महायुतीच्या सर्व उमेदवारांची तातडीची बैठक शनिवारी सकाळी होणार आहे.
ReplyForwardAdd reaction |