मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार!
राजकीय प्रक्रिया हाताळणं सोपी गोष्ट नाही- जरांगे
जालना: मराठा आरक्षणासाठी रात्रंदिवस लढा देणारे मनोज जरांगे यांनी अखेर विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विधानसभा निवडणूक लढविण्यावर जरांगे यांच्याकडून चर्चा केली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर 3 नोव्हेंबर रोजी कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार याची माहिती दिली होती. तसेच कोणत्या जागेवर उमेदवार पाडण्याचे काम करायचे याबाबतही त्यांनी सांगितले होते, परंतु जरांगे यांनी आज मोठा निर्णय घेतला, त्यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली ते विधानसभेत एकही जागा लढवणार नाही असा निर्णय त्यांनी घेतला आहे. म्हणून जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेतली या परिषदेत त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले आह..
‘आम्ही रात्री साडेतीन पर्यंत चर्चेला बसलो होतो आम्ही या निवडणुकीत मित्र पक्षांसोबत दलित आणि मुस्लिम उमेदवार उभे करणार होतो, कारण एका जातीच्या जोरावर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. आम्ही राजकारणात नक्की आहोत पण उमेदवार उभा करून तो पडला तर जातीची लाज जाईल. त्यामुळे आम्ही विधानसभा निवडणूक लढवायची नाही असा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे आज माझी सगळ्या मराठा उमेदवारांना विनंती आहे की सगळ्यांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत. निवडणूक हा काही आपला खानदानी धंदा नाही, एका जातीच्या जोरावर निवडणूक जिंकणे शक्य नाही एका जातीवर पुढे जाणे शक्य नाही हे एक मतांनी ठरवण्यात आले त्यामुळे आपण निवडणूक लढवायची नाही असा निर्णय घेण्यात आला फक्त उमेदवार पाडायचे असे आमच्या बैठकीत ठरल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
परंतु आता पुढे काय?
निवडणूक लागण्यापूर्वीचा रंग याने निवडणुकीत सक्रियपणे उतरण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी बदलत्या राजकीय समीकरणाचे विचार करून आपली रणनीती तयार केली होती . मात्र जरांगे यांनी आता थेट निवडणुकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जरांगे यांच्या भूमिकेनंतर राजकीय गणित बदलणार आहे. असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही